आता 'प्राईम मिनिस्टर ऑफ भारत'
राष्ट्रपतींसाठी 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख केल्यानंतर आता सरकारी पत्रकावर पंतप्रधानांसाठी 'प्राईम मिनिस्टर ऑफ भारत' असा उल्लेख सरकारने केला आहे. त्यामुळे देशाचे नाव 'इंडिया' ऐवजी 'भारत' हेच एकमेव ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्या दिशेने गांभीर्याने पावले टाकण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी इंडोनेशियात होणाऱ्या आसियान- भारत शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी बुधवारी रात्री रवाना
India of भारत
इंडियाचे भारत करण्यासाठी सरकार आग्रही झाले. या दौऱ्याची माहिती देणारे एक सरकारी पत्रक भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक्स सोशल मीडियावर शेअर केले. यामध्ये पंतप्रधानांचा उल्लेख 'द प्राईम मिनिस्टर ऑफ भारत' असा करण्यात आला आहे. यापूर्वी जी-२० शिखर परिषदेनिमित्त आयोजित स्नेहभोजनासाठीच्याआमंत्रणपत्रिकेत राष्ट्रपतींचा उल्लेख प्रेसिडेंट ऑफ भारत असा करण्यात आला होता. यामुळे राजकारण तापले आहे. इंडिया आघाडीला घाबरून मोदी देशाच्या इंडिया आणि भारत या दोन नावांपैकी इंडिया हे नाव हटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप विरोधकांच्या आघाडीचे घटक पक्ष करत आहेत. तर भारत या नावाला विरोधकांचा आक्षेप का आहे, असा प्रश्न भाजपकडून विचारण्यात येत आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात देशाच्या नावातील बदलासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुम्ही प्रतीसात दिल्या बद्दल धन्यवाद
MARATHI KNOWLEDGE 247